MPSC मधून सरकारी नोकरी मिळवा | संपूर्ण मार्गदर्शन, तयारी टिप्स आणि अर्ज स्टेप्स | spardhasankalp.com

 

MPSC

MPSC म्हणजे काय? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो!

MPSC (महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन) ही महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांसाठीची सर्वात मोठी परीक्षा आहे. जर तुम्ही प्रशासकीय सेवेत करिअर करू इच्छित असाल, तर MPSC तुमच्यासाठी सोन्याची  संधी आहे. या ब्लॉगमध्ये MPSC ची संपूर्ण माहिती, पदे, परीक्षा पद्धत, वेळापत्रक आणि अर्ज प्रक्रिया सविस्तर समजावून सांगतो. चला सुरुवात करूया!

MPSC ची स्थापना आणि भूमिका:

MPSC ची स्थापना भारतीय संविधानाच्या ३१५ व्या अनुच्छेदानुसार   झाली आहे. हे महाराष्ट्रातील उत्तम प्रशासक घडवते, ज्यामुळे शासनाचे कामकाज सुरळीत चालते.

·    मुख्य सेवांमध्ये: राज्यसेवा, वनसेवा आणि पोलीस सेवा यांचा समावेश.

·    उद्देश: उमेदवारांचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता तपासणे आणि त्यांना करिअरची संधी देणे.

महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवांमधील पदे:

        MPSC मधून विविध ग्रुप्समधील पदांवर भरती होते. त्यांची विभागणी:

A)    ग्रुप A (राजपत्रित अधिकारी) उच्चस्तरीय आणि प्रतिष्ठित नोकऱ्या:

·    उपजिल्हाधिकारी (Deputy Collector)

·    उपपोलिस अधीक्षक (Deputy Superintendent of Police)

·    सहाय्यक पोलिस आयुक्त (Assistant Commissioner of Police)

·    राज्य कर सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner of State Taxes)

·    तहसीलदार

·    इतर: उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ब्लॉक विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी,    राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक.

B)    ग्रुप B (राजपत्रित आणि अराजपत्रित) मध्यमस्तरीय पदे :

·    पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector)

·    विक्रीकर/राज्य कर निरीक्षक (Sales Tax/State Tax Inspector)

·    सहाय्यक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer)

·    नायब तहसीलदार

·    इतर: सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, लेखा अधिकारी.

C)    ग्रुप C (विशेष सेवा) :

·    सामान्य गट: लिपिक-टायपिस्ट (मराठी/इंग्रजी), कर सहाय्यक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक.

·    अभियांत्रिकी सेवा: सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल).

·    वैद्यकीय आणि न्यायिक सेवा: वैद्यकीय अधिकारी, नागरी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग), न्यायिक मजिस्ट्रेट.

·    वन कृषी सेवा: सहाय्यक अरण्यसंरक्षक, रेंज अरण्य अधिकारी, कृषी अधिकारी.

 

MPSC राज्यसेवा परीक्षा निवड प्रक्रिया : 

MPSC राज्यसेवा परीक्षा तीन टप्प्यांत  होते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत.   २०२५/२०२६ पासून मुख्य परीक्षा ( UPSC सारखीवर्णनात्मक  स्वरुपाची  आहे.

१)    २०२६ चे परीक्षा वेळापत्रक :

·    राज्यसेवा पूर्व परीक्षा: ३१ मे २०२६

·    राज्यसेवा मुख्य परीक्षा: ऑक्टोबर २०२६ (, , १७, १८, २४ तारखा अपेक्षित)

·    संयुक्त ग्रुप B पूर्व: १४ जून २०२६ | मुख्य: डिसेंबर २०२६

·    संयुक्त ग्रुप C पूर्व: १२ जुलै २०२६ | मुख्य: १३ डिसेंबर २०२६

२)    पात्रता निकष :

·    वय: सामान्यसाठी १९-३८ वर्षे; आरक्षित/OBC/SC/ST साठी ४३ वर्षे; PwD साठी ४५ वर्षे.

·    शिक्षण: कोणत्याही शाखेची पदवी (अंतिम वर्षातील विद्यार्थी पात्र).

·    भाषा: मराठी प्राविण्य अनिवार्य.

३)    नवीन परीक्षा पद्धत (राज्यसेवा) :

·    पूर्वपरीक्षा (४०० गुण): वस्तुनिष्ठ पेपर (GS + CSAT). CSAT साठी ३३%     आवश्यक; चुकीवर / निगेटिव्ह मार्किंग.

·    मुख्य परीक्षा (,७५० गुण): वर्णनात्मक पेपर.

~> ७ मेरिट पेपर: निबंध, GS, ऐच्छिक (२५० गुण प्रत्येकी).

~> २ पात्रता पेपर: मराठी / इंग्रजी (३०० गुण प्रत्येकी; २५% आवश्यक).

    ·    मुलाखत (२७५ गुण): व्यक्तिमत्त्व आणि संवाद कौशल्य तपास.

४)    अर्ज प्रक्रिया :

    • तयारीपूर्वी आवश्यक गोष्टी :

·    दस्तऐवज तयार ठेवा:   आधार कार्ड / पॅनकार्ड   (KYC साठी), पदवी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, फोटो, सहीचे स्कॅन (JPG/PDF फॉरमॅटमध्ये).

·    ईमेल आणि मोबाइल नंबर: वैध असावा, कारण OTP येईल.

·    शुल्क: खुला वर्ग ५४४/-, राखीव ३४४/- (डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI ने भरा)

    • अर्ज कसा भरावा ?

a)    वेबसाइटवर   जा:     mpsconline.gov.in  वर जा. (होम पेजवरून "Candidate Login" निवडा.)

b)    नोंदणी (Registration): 

Ø  नवीन असाल तर  "New User? Register Here" वर क्लिक.

Ø  नाव, मोबाइल, ईमेल भरा. OTP वेरीफाय करा.

Ø  USER ID आणि पासवर्ड तयार होईल. (नोंदणी झाल्यावर ईमेल /   SMS येईल.)

c)    KYC पूर्ण करा:

Ø  लॉगिन नंतर "My Profile" मध्ये जा.

Ø  आधार/PAN अपलोड करा. -KYC प्रक्रिया पूर्ण करा (OTP आधारित).

Ø  फोटो आणि सही अपलोड करा.   (फोटो २०-५० KB, १५०x१८० पिक्सेल).

d)    प्रोफाइल   अपडेट:

Ø  वैयक्तिक माहिती (नाव, जन्मतारीख, पत्ता, शिक्षण) नीट भरा.

Ø  MPSC च्या होम पेजवरील नोटिफिकेशन वाचा तपशीलवार सूचना असतात.

e)    अर्ज भरा (Apply Online):

Ø  होमवरून त्या परीक्षेचे नोटिफिकेशन   (उदा. राज्यसेवा २०२६) निवडा.

Ø  "Apply Online" वर क्लिक. पोस्ट निवडा (ग्रुप A/B/C).

Ø  फॉर्म भरा, पूर्वीची माहिती ऑटो-फील होईल.

Ø  प्रिव्ह्यू चेक करा, दुरुस्ती करा.

f)    शुल्क भरा आणि सबमिट:

Ø  शुल्क पेमेंट करा.

Ø  "Submit" करा. अर्ज नंबर/बारकोड मिळेल (प्रिंट घ्या!).

Ø  अर्ज संपादनाची शेवटची डेडलाइन नोटिफिकेशनमध्ये असते.

g)    महत्वाच्या  टिप्स:

·    डेडलाइन: पूर्वपरीक्षा ३१ मे २०२६ साठी अर्ज मार्च / एप्रिलमध्ये येतील  

    वेबसाइट चेक करा.

·    चुका टाळा: माहिती दोनदा चेक करा, कारण नंतर बदलने कठीण आहे.

·    ऍडमिट कार्ड: अर्ज नंतर १०-१५ दिवसांनी डाउनलोड करता येईल.

·    सहाय्य: समस्या असल्यास MPSC हेल्पलाइन (०२०-२५६५१२११) किंवा ईमेल करा.

५)   तयारी कशी करावी :

·    पूर्व परीक्षा - NCERTलोकराज्य, योजना.

·    मुख्य  परीक्षा - निबंध / GS साठी लोकसत्ता वर्तमानपत्र, 

      ऐच्छिक विषय (इतिहास / भूगोल)

·    डेली रुटीन - ८ तास अभ्यास, मॉक टेस्ट, मराठी प्राविण्य वाढावा.

        MPSC ही तुमच्या स्वप्नांची पायरी आहे! योग्य तयारीने यश नक्की मिळेल.

        अधिक अपडेट्ससाठी कमेंट करा!


धन्यवाद
सिद्धेश स्नेहल श्रीराम धुरी
स्पर्धा संकल्प
ध्येय्यपूर्तिसाठी अखंड प्रयत्न  

Comments

Best Post

२०२६चे पद्म पुरस्कार जाहीर

UPSC निवड प्रक्रिया | परीक्षेचा सखोल अभ्यासक्रम | तयारीसाठी महत्त्वाची कौशल्ये | spardhasankalp.com

UPSC परीक्षा संपूर्ण माहिती 2026 | पात्रता आणि तयारीचे राजमार्ग | spardhasankalp.com